राहुल गांधींना मोठा नेता मानण्याची गरज नाही!

काँग्रेस पक्षाच्या खासदाराचे वक्तव्य

राहुल गांधींना मोठा नेता मानण्याची गरज नाही!

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे धाकटे बंधू लक्ष्मण सिंह यांनी राहुल गांधींना एवढे महत्व देण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे.काँग्रेसचे माजी खासदार लक्ष्मण सिंह म्हणाले की, राहुल गांधींना एवढा मोठा नेता मानू नये असे म्हटले आहे.राहुल गांधी हे काँग्रेस पार्टीचे एक सामान्य कार्यकर्ता आहेत, या व्यतिरिक्त ते कोणीच नाहीत, असे लक्ष्मण सिंह म्हणाले.दरम्यान, राहुल गांधी यांच्याविरुद्ध खुद्द पक्षाच्याच खासदाराने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा होत आहे.शनिवारी गुना शहरातील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

लक्ष्मण सिंह म्हणाले, “राहुल गांधी हे खासदार आहेत, ते (पक्ष) अध्यक्ष नाहीत आणि काँग्रेसचे एक कार्यकर्ते आहेत. या व्यतिरिक्त राहुल गांधी कोणीच नाहीत. त्यांना एवढं हायलाइट करू नये.पत्रकारांनी लक्ष्मण सिंह यांना एक प्रश्न केला की, राहुल गांधींना टीव्हीवर कमी दाखवले जाते.यावर लक्ष्मण सिंह म्हणाले की, राहुल गांधी हे पक्षाच्या इतर खासदारांसारखे सामान्य खासदार आहेत.माध्यमांनी राहुल गांधींना इतके हायलाइट करण्याची गरज नाही.

हे ही वाचा:

म्हैसूर: ड्रेनेजच्या खोदकामात ११ व्या शतकातील तीन जैन शिल्पे सापडली!

सावधान! राम मंदिराच्या नावाने क्यू-आर कोड पाठवून उकळतायत पैसे

सरत्या वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला देशाच्या यशाच्या आलेखाचा आढावा

भविष्य उज्जवल आहे… आता दहशतवादीच पाकिस्तानला पोसणार!

लक्ष्मण सिंह पुढे म्हणाले की, माणूस जन्माने नाही तर कर्माने महान बनतो. मी राहुल गांधी यांना मोठा नेता मानत नाही, तुम्ही सुद्धा मानू नका.ते एक सामान्य खासदार आहेत.त्यामुळे तुम्ही त्यांना हायलाइट केल्याने इतके काही फरक पडणार नाही, असे लक्ष्मण सिंह म्हणाले.

दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रियंका मीना यांनी लक्ष्मण सिंह यांचा ६१,००० हुन अधिक मतांनी पराभव केला होता.लक्ष्मण सिंह यापूर्वी पाच वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार होते.

 

Exit mobile version