काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंना ईडीने अटक केली आहे. आज सकाळी, ३१ मार्चला पाचच्या सुमारास ईडीने सतीश उकेंच्या घरावर धाड टाकली होती. सकाळपासून त्यांची ईडीची चौकशी सुरु होती. अखेर बारा तासांच्या चौकशीनंतर संध्यकाळी त्यांना ईडीने अटक केली आहे. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत.
एका जमिनी प्रकरणी ईडीने सतीश यांच्यावर कारवाई केली आहे. आजच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली असून आता मेडिकलसाठी ते रवाना झाले आहेत. सकाळी ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्या नागपुरातील पार्वती नगर येथील घरावर छापेमारीला सुरुवात केली होती. यावेळी ईडीने कागदपत्रे, मोबाईल, आणि लॅपटॉप ताब्यात घेतले होते. तर पाच तासांच्या कारवाईनंतर ईडीने सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आले आहे. ईडीचे नऊ अधिकारी आणि दोन महिला अधिकारी सतीश उके यांच्या घरात दाखल झाले होते. तसेच सीआरपीएफचे जवान त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले होते.
हे ही वाचा:
महाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त! सगळे उत्सव उत्साहात साजरे करा!!
माणसाच्या आनंदात मुक्या जनावराचा बळी!
आसाम, मणिपूर, नागालँडमधील AFSPA क्षेत्र कमी करण्याचा निर्णय
नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला आग!
जमीन गैरव्यवहार प्रकरणी सतीश उके नागपूर पोलिसांच्या रडारवर होते. २०१८ साली त्यांना एका जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकही झाली होती. विशेष म्हणजे, सतीश उके यांनीही सीबीआय न्यायाधीश न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचे खळबळजनक प्रकरण उपस्थित केले होते. तसेच फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर पाचशे कोटी रुपयांचा मानहानीचा खटलाही दाखल करण्यात आला आहे.