अंधेरीत भाजयुमो कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला

अंधेरीत भाजयुमो कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला

अंधेरी एमआयडीसी परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच विषयावर ट्विट करत ठाकरे सरकारचा आणि पोलीस लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे.\

“अंधेरीत खड्ड्यांविरुद्ध शांततामय मार्गाने निदर्शनं करत असलेल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्जचा आम्ही निषेध करतो. आम्ही पोलिसांच्या अशा अत्याचारामुळे घाबरणार नाही. आम्ही याहून तीव्र निदर्शनं करू. या लाठीहल्ल्यात भाजयुमोचे १५ कार्यकर्ते जखमी झाले.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजयुमो कार्यकर्त्यांवरच्या लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे.

आंदोलकांवर मोठ्या प्रमाणात लाठीहल्ला करण्यात आला ज्यामध्ये १५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांना हाताला आणि पायाला गंभीर जखम झाली. त्यांनी आरोप केला आहे की पोलिसांनी त्यांचे कपडे फाडले व लाठी चार्ज केला त्यात त्यांच्या हाताला आणि डोकयला मार लागून रक्त आले आहे. तेजिंदर सिंग व भाजयुवा मोर्चा कार्यकर्त्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

एलएसीचं रक्षण करायला ‘वज्र’ तैनात

मी स्वतः भारतीय लस घेतली आहे, यूएनजीए अध्यक्षांनी जगाला सांगितले

पंजाबमध्ये कॅप्टन स्वतःची वेगळी ‘इनिंग’ सुरु करणार

शहरांमधील कचऱ्याचे डोंगर नष्ट करणार

मुंबईतील रस्त्यांवरील खड्यांविरोधात भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीहल्ला करण्यात आला होता.

Exit mobile version