पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा शेवटचा टप्पा

पश्चिम बंगालमध्ये सुमारे गेला महिनाभर निवडणुकांचे वारे वाहत आहेत. आज त्या निवडणुकांच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात आढळले ६३,३०९ नवे कोरोना रूग्ण

चेन्नईचा सुपर विजय

दाभाडकर काकांच्या मुलीने केली टीकाकारांची तोंडे बंद

अदर पुनावालांभोवती ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कडे

आज बंगालमध्ये मतदानाचा आठवा टप्पा पार पडत आहे. यावेळी अधिकाधीक लोकांनी मतदान करावे यासाठी मोदींनी आवाहन केले आहे. ते म्हणतात,

बंगाल निवडणुका २०२१चा आज शेवटचा टप्पा पार पडत आहे. मी लोकांना कोविड-१९च्या निर्बंधांचे पालन करत मतदान करून लोकशाही सशक्त करण्याचे आवाहन करतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंगाली भाषेतून ट्वीट केले आहे. ते म्हणतात,

आज बंगालच्या निवडणुकांचा आठवा टप्पा पार पडत आहे. आधीच्या सात टप्प्यांप्रमाणेच मी सर्व पात्र बंगाली मतदारांना उत्साहाने येऊन बंगालच्या विकासासाठी आणि उत्तम नियमनासाठी मतदान करण्याची विनंती करतो.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांना २७ मार्च पासून प्रारंभ झाला. एकूण आठ टप्प्यात ही निवडणुक पार पडली. पश्चिम बंगालसोबतच आसाम, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी यांच्या निवडणुका देखील झाल्या. त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातील पोटनिवडणुक देखील पार पडली.

या सर्व निवडणुकांचे निकाल २ मे रोजी लागणार आहेत. मात्र कोविड-१९चा वाढता प्रभाव लक्षात घेता निवडणुक आयोगाने विजेत्या पक्षांवर कोणत्याही प्रकारच्या विजय मिरवणुकीवर बंदी घातली आहे.

Exit mobile version