बंगालमध्ये राजकीय हिंसाचार हा काही नवीन नाही. काँग्रेसचं सरकार असो, किंवा डाव्या पक्षांचं सरकार असो, राजकीय हिंसाचार हा सुरूच होता. परंतु तृणमूल काँग्रेस पक्षाने या हिंसाचाराला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले आहे. कालच पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभा क्षेत्रामध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडांकडून भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. यावेळी पोलीस प्रशासन मुकदर्शकाच्या भूमिकेत असल्याचं चित्र समोर आलं आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी याविषयी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
Bloody politics of Trinamool ! Y’day night’s violent attack on @BJP4India workers by goons of @AITCofficial at Bhavanipur constituency ! Local Police is just a mute spectator ! pic.twitter.com/Ietv9mnv6n
— Dr. VINAY Sahasrabuddhe (@vinay1011) April 9, 2021
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राम मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.ममता बॅनर्जी नंदीग्राम मधून निवडणूक लढवणार असून भवानीपूरमध्ये सोभनदीप चट्टोपाध्याय हे निवडणूक लढवणार आहेत. ममता बॅनर्जींच्या भवानीपूर मतदार संघाला भाजपाने लक्ष्य केलं होतं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी डिसेंबर महिन्यात बंगालचा दौरा केला होता. या दौऱ्यावर असताना त्यांनी भवानीपूर मतदारसंघालाही भेट दिली होती. भवानीपूर मतदारसंघामधील लोकसंख्येचे बदलते गणित लक्षात घेणे गरजेचे आहे. या मतदारसंघात गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची संख्या ही ५०-६० टक्क्यांच्या जवळपास आहे. ममता बॅनर्जी या गेली अनेक वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विशेष करून गृहमंत्री अमित शाह यांना गुजराती असल्यामुळे ‘बाहरी’ असल्याचे ठरवत आहेत. अशावेळी गुजराती आणि मारवाडी मतदार बहुसंख्य असलेल्या मतदार संघातून निवडणूक लढवणे ममता बॅनर्जींना योग्य वाटले नाही यात काही नवीन नाही.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन?
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही
१४९ जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोना रुग्ण नाही
एमपीएसी परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मागणी
परंतु तरीही प्रतिष्ठीत अशा भवानीपूर मतदार संघामध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाने गुंडगिरी करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे प्रयत्न बंगालमध्ये सर्वच ठिकाणी होताना दिसत आहेत. परंतु यावेळी हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला आहे.