मराठवाड्याला गणेशोत्सवाची भेट; मुख्यमंत्र्यांकडून निधीचा पाऊस

राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मोठ्या घोषणा

मराठवाड्याला गणेशोत्सवाची भेट; मुख्यमंत्र्यांकडून निधीचा पाऊस

मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक शनिवार, १६ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात पार पडली. तब्बल सात वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक झाली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण ४६ हजार ४५३ कोटी ९० लाख खर्च करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत तब्बल ३५ हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

मराठवाडयात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार असून आता ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर करण्यात आला आहे. तसेच या बैठकीत एकूण ५९ हजार कोटींचा निर्णय झाला असून, त्यात नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटीचा समावेश आहे. “पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत निर्णय घेतला. दमणगंगा-वैतारणा-गोदावरी प्रमुख उपसा वळण योजना, दमणगंगा एकदरे गोदावरी आणि पार गोदावरी यावर १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गिल खेळला, पण पराभव झाला!

सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, सेंड अँड्र्यूज कॉलेजला जेतेपद

आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा

चंद्रावर पाणी असल्याला पृथ्वीचे वातावरण जबाबदार

कोणत्या विभागाला किती निधी?

Exit mobile version