21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणराज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!

राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!

एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या भावना

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त आघाडी घेऊन विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू केली आहे. राज्यभरातील नेत्यांच्या या यशावर प्रतिक्रिया येत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली प्रतिक्रिया देऊन मतदारांचे आणि सर्वांचे आभार मानले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “माझ्या लाडकी बहिणींचे मनापासून अभिनंदन करतो. आम्ही केलेल्या विकासकामांची पोचपावती मिळाली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीला आशीर्वाद दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो. समाजातील प्रत्येक घटकाचे अभिनंदन करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,” अशी आनंदी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी मिळाली असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.

महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कामाची पोचपावती लोकांनी आम्हाला दिली आहे. सर्वसामान्यांचे सरकार काय करू शकते हे आम्ही विकास आणि योजनांच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. प्रामाणिक इच्छा असेल तर सरकार काय करू शकते हे आम्ही दाखवून दिले आहे. विकासाची आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घाताली. आज नभुतोनभविष्यती असा विजय मिळाला आहे. फार पूर्वी आमचे सर्व उमेदवार निवडणूक येतील असं म्हणलो होतो आणि आज ते सत्य झाले आहे. आता जबाबदारी वाढली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री कोण होणार, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अंतिम निकाल येऊ द्या. नंतर ज्या प्रकारे आपण एकत्र निवडणुका लढवल्या, त्याचप्रमाणे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी लाडू खाऊन विजयाचा आनंद साजरा केला. तसेच त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील पक्षाच्या सदस्यांसोबत आनंदोत्सव साजरा करताना दिसले.

हे ही वाचा:

राऊतांची रडारड; म्हणे निकालाचा कौल जनतेचा नसून लावून घेतलेला

भाजपा १२५ जागांवर विजय मिळवेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील!

नक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा

फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आम्ही सहर्ष स्वीकार करू!

दरम्यान, निवडणुकीच्या आयोगाच्या आकडेवारीनुसार महायुतीने २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी २० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, राज्यात महायुतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा