उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या चिरडून झालेल्या मृत्यूप्रकरणातील काही छायाचित्रे विशेष तपास पथकाने (एसआयटी) जारी केली आहेत.
या घटनेत जे संशयित समोर आले आहेत, त्यांची ही छायाचित्रे आहेत. पोलिसांनी या छायाचित्रांच्या माध्यमातून संशयितांना ओळखण्याची विनंती लोकांना केली असून लोकांनी यासंदर्भात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिवाय, विशेष तपास पथकाने ही ओळख पटविण्यासाठी इनामही जाहीर केले आहे. ज्यांच्याकडून या संशयितांची माहिती देण्यात येईल, त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे आश्वासनही विशेष तपास पथकाने दिले आहे.
या विशेष तपास पथकाने भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी ५० शेतकऱ्यांना चौकशीसाठी बोलावणे धाडले होते. त्यातील १५ शेतकरी विशेष तपास पथकासमोर हजर झाले. त्यांनी आपली बाजू मांडली. त्यावर पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही यासंदर्भात दाखल झालेल्या एफआयआरची चौकशी करत असून शेतकऱ्यांचे जाब नोंदविण्यात आले आहेत.
सोमवारी एसआयटीने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्राच्या चार साथीदारांना ताब्यात घेतले. त्यात सुमित जयस्वालचाही समावेश आहे. ज्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येसंदर्भात शेतकऱ्यांवर एफआयआर दाखल केला आहे. चार शेतकऱ्यांच्या मृत्युनंतर जयस्वाल फरार होता.
हे ही वाचा:
जरंडेश्वर प्रकरणी सोमैय्यांची ईडीकडे तक्रार
मुंबईच्या फुटपाथवरून जप्त केले २१ कोटीचे हेरॉईन आणि महिलेला केले जेरबंद
ठाकरे सरकार हेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मालमत्तेवर महाविकास आघाडीचा डोळा
लखीमपूरच्या या घटनेमुळे संपूर्ण देशभरात हा विषय पेटविण्यात आला. यासंदर्भात अजय मिश्रा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी भेट देत या विषयावर राजकारण केले.