‘गुरुनानक देवजींची तपोभूमी लाहोर भारतात नाही, हे काँग्रेसने केलेले पाप’

‘गुरुनानक देवजींची तपोभूमी लाहोर भारतात नाही, हे काँग्रेसने केलेले पाप’

पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठीचा सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारसभेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

१९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि १९७१ चे बांगलादेश युद्ध या घटनांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा काँग्रेस होती. सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर लाहोर येथे गुरुनानक देवजींच्या तपोभूमीला भारतात घेतले जावे एवढंही काँग्रेसच्या नेत्यांना कळालं नाही का? लाहोर भारतात नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले पाप आहे. आपल्या भावना दुखावल्या आहेत,” असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

 

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात भारत-पाकिस्तान १९६५ साली झालेल्या युद्धाचे उदाहरणही दिले आहे. यावेळी काँग्रेसने दुसरी संधी गमावली असेही ते म्हणाले आहेत.

१९६५ च्या लढाईमध्ये भारतीय सेना लाहोरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या हेतूनेच पुढे गेली होती. यावेळी दोन पावलं आणखी पुढे गेले असते तर गुरुनानक देवजींची तपोभूमी आपल्याकडे असती.”असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास

३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’

संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी

तर तिसरी घटना सांगताना त्यांनी १९७१ मधील बांगलादेश युद्धाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले, “बांगलादेशच्या युद्धात नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर गुडघे टेकले होते. तेव्हा दिल्लीत बसलेल्या काँग्रेस सरकारमध्ये हिंमत असती तर ते म्हणाले असते की तुमचे सैनिक तुम्हाला तेव्हाच परत मिळतील जेव्हा आम्हाला गुरुनानक देवजींची तपोभूमि परत मिळेल.” असे गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केले आहेत. या घटनांचा संदर्भ देत काँग्रेसने लाहोरला भारतात आणण्याच्या तीन संधी गमावल्या असंही ते म्हणाले.

Exit mobile version