भाजपाचा एमएमआरडीएला दणका

भाजपाचा एमएमआरडीएला दणका

कुरारच्या कुटुंबांचे तिथेच पुनर्वसन होणार

कुरार मेट्रो स्टेशनजवळच्या एकूण १२० बाधित कुटुंबांचे एमएमआरडीएने सक्तीने अन्यत्र पुनर्वसन करण्याचा घेतलेला निर्णय मुंबई भाजपाच्या धरणे आंदोलनामुळे मागे घ्यावा लागला. आता या सर्व कुटुंबियांचे आहे त्याठिकाणीच पुनर्वसन करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले आहे.

हे ही वाचा :

अजित पवारांच्या मामाचा कारखाना जप्त

अजित पवारांच्या मामाचा कारखाना जप्त

‘डॉक्टर डे’ च्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

शिंदे, पालांडे यांची कोठडी ६ जुलैपर्यंत वाढविली

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले की, आमची मागणी आहे की, या लोकांचे पुनर्वसन हे गिरगाव पॅटर्नवर झाले पाहिजे. यातील १०० हून अधिक लोक हे मराठी आहेत. मला आशा आहे की, मुख्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री हे मराठी माणसासाठी भांडत असतात, तेव्हा ते या मराठी माणसाला ते मालाडच्या बाहेर जाऊ देणार नाहीत. त्यांची जेवढी जागा आहे, तेवढी जागा त्यांना उपलब्ध करून द्या. आम्हाला असे कळते आहे की, नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या मेट्रो स्टेशनचे उद्घाटन करायचे आहे. पण सर्वसामान्य मुंबईकराच्या छातीवर बुलडोझर फिरवून आम्ही हे पुनर्वसन होऊ देणार नाही. आम्हाला या लोकांचे पुनर्वसन इथेच पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांचा जो पॅटर्न होता, तोच अमलात यायला हवा. तूर्तास आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत. पण एमएमआरडीए नीट वागली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसू.

भाजपाने आंदोलनाची हाक दिल्यानंतर एमएमआरडीएच्या उपायुक्त सुषमा परब,अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत आदींनी घराचा विषय धसास लावण्याचे सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर धरणे स्थगित करण्यात आले.

कुरारच्या या कुटुंबांचे अन्यत्र पुनर्वसन केले जाणार असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. भाजपाने या कुटुंबांचे म्हणणे ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाची हाक दिली. सेवानगर येथे हे आंदोलन करण्यात येणार होते.

 

Exit mobile version