देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशात रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे येत आहेत. कोरोना बळींचे आकडेही त्याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्ग वेगाने वाढत असतानाच कुंभ मेळा आणि रमजानमध्ये मात्र कोरोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. त्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली आहे.
कुंभ मेळा आणि रमजानमध्ये कोरोना नियमांचं पालन केलं जात नसल्याने अमित शहा यांनी त्यावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुंभ मेळा आणि रमजान उत्सवात भाग घेणारे लोक कोरोना नियमांचं पालन करण्यात अपयशी ठरले आहेत. कुंभ मेळा असो की रमजान कुठेही कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळेच यंदाचा कुंभ मेळा प्रतिकात्म साजरा करण्याचं आम्ही आवाहन केलं आहे, असं अमित शाह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: साधू संतांना आवाहन केलं आहे. कुंभ मेळावा प्रतिकात्मक साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. संतानी त्यांच्या आवाहनला प्रतिसादही दिला आहे. त्यानंतर १३ पैकी १२ आखाड्यांनी कुंभचं विसर्जन केलं आहे. संतांनी जनतेलाही कुंभला न येण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या आवाहनानंतर प्रतिकात्मक कुंभ साजरा केला जात आहे. ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी नवाब मलिक यांनी खोटी माहिती दिली
आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक
‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य
मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून काय लिहिले?
कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आम्ही राज्यांना अधिकार दिले आहेत. कारण प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यानुसार त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणूनच राज्यांना स्वत: निर्णय घेण्याचे अधिकार दिला आहेत. त्यांना केंद्र सरकार पूर्णपणे मदत करेल, असं शहा यांनी सांगितलं.