‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक; सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाईल’

‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक; सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाईल’

कुमार विश्वास यांचा खळबळजनक दावा

पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या लढतीत आम आदमी पक्ष, भाजप, अकाली दल आणि काँग्रेस पक्ष यांच्यात शर्यत आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी खळबळजनक विधान केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहे. ‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक आहेत. सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो,’ असा आरोप कुमार विश्वास यांनी केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कायम खलिस्तानचे समर्थक राहिले आहेत. तसेच आपण त्यांच्यासोबत असताना ते अनेकदा त्यांच्या योजनांबद्दल सांगत असायचे. मी एकतर पंजाब राज्याचा मुख्यमंत्री होईन किंवा स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान होईन, असे ते म्हणाले होते असा आरोप कुमार विश्वास यांनी केला आहे. ‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक आहेत. सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.

कुमार विश्वास म्हणाले की, विघटनवादी संघटनांची साथ घेऊ नको असे मी म्हटले होते. पण पंजाबात भांडणे लावून आपण सत्ता मिळवू शकतो. असे तो म्हणत असे. त्यांच्या डोक्यात विघटनवाद एवढा ठासून भरला आहे, की सत्तेसमोर त्याला त्याचे काहीही वाटत नाही.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

अजित डोभाल यांच्या घरात शिरली एक अज्ञात व्यक्ती

संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी भजनात रमले

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

२० फेब्रुवारी रोजी पंजाबमधील सर्व ११७ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, परंतु रविदास जयंतीमुळे निवडणूक आयोगाने २० फेब्रुवारी २०२२ ही मतदानाची तारीख जाहीर केली.

Exit mobile version