कुचिक बलात्कार पीडित तरुणीचे चित्रा वाघ यांच्यावर आरोप

कुचिक बलात्कार पीडित तरुणीचे चित्रा वाघ यांच्यावर आरोप

पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज अचानक पलटी मारली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच या तरुणीने पलटवार केला आहे. चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिली असल्याचे या तरुणीने म्हटले आहे.

पिडीत मुलीने आज, १२ एप्रिल रोजी दावा केला की, मला सुसाईड नोट लिहण्यास चित्रा ताई यांनी भाग पाडले तसेच खोटे मेसेज देखील वाचून दाखवले आहेत. हे मेसेज मी त्यांना पाठवले नाहीत किंवा त्यानेही मला कोणते मेसेज पाठवले नाहीत. त्यामुळे मी या सर्वांबाबत पोलिसांना सांगणार असल्याचे पीडितेने सांगितले आहे.

पुण्यातील शिवसेनेचे कामगार नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी त्यानंतर अनेकदा या संदर्भात पत्रकार परिषदा घेऊन रघुनाथ कुचिक यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता.

या पीडित मुलीचे अपहरण झाल्याचा दावाही चित्रा वाघ आणि या मुलीने केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांना या मुलीचा शोध घ्यावा लागला. काही दिवसानंतर ही पीडित मुलगी सर्वांसमोर आल्यानंतर पुणे पोलीसांनी तिच्याकडे चौकशी सुरु केली होती. त्यानंतर या मुलीने आता पलटी मारली असून चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले आहेत.

हे ही वाचा:

तोंडी आरोपांची राळ उडवणाऱ्या राऊत यांच्याकडून नवे आरोप

नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले

पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल

पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!

या पीडीतेने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्य महिला आयोग अध्यक्ष आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी लगेच पुढाकार घेऊन ‘दूध का दूध, पानी का पानी’ व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Exit mobile version