भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांनी योगी सरकारला पत्र लिहिले आहे. उत्तर प्रदेशमधील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. यामुळे उत्तर प्रदेशच्या लोकांना महाराष्ट्रात चांगल्या नोकऱ्या मिळतील, असं पत्रात म्हटलं आहे.
भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. आपल्या पत्रात म्हटले आहे की, “मी गेल्या ५० वर्षांपासून मुंबईत राहतोय. जे लोक उत्तर प्रदेशातून स्थलांतरीत होऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईत येतात, तेव्हा त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी करायची असेल तर मराठी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलांना शाळेत मराठी भाषा शिकवली गेली तर त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना मराठी या विषयाचा पर्याय असावा,” अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कर्नाटकातून अटक
७५ किमीचा रस्ता पाच दिवसात बांधून भारताने रचला विक्रम
नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!
या मागणीनंतर विशेष म्हणजे योगी सरकारकडून या प्रस्तावावर सकारात्मक विचार होत असल्याची माहिती समोर आली आहे.