‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’

‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकाच मंचावर

मंगळवार, १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, देहूतील यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यांनतर पंतप्रधान मोदी मुंबईला रवाना झाले. तिथे त्यांनी राजभवनातील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन झालंकेले आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजभवनात क्रांतीगाथा गॅलरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी नवीन जलभूषण इमारतीचंही उद्घाटनं पार पडलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी जनतेला वटपौर्णिमा आणि संत कबीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, महाराष्ट्रानं देशाला अनेक वीर सेनानी दिले आहेत. याच महाराष्ट्राने देशाला प्रेरणा आणि महाराष्ट्रातील संतांनी देशाला ऊर्जा दिली आहे.

महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रानं देशाला प्रेरित केलं आहे. संत तुकारामांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी समाजसुधारण्याचं कार्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं जीवन राष्ट्रभक्तीची प्रेरणा देतं.
क्रांतीगाथा गॅलरीबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले, एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. नवं राजभवन आणि क्रांतिवीर गॅलरीत आल्यांनतर जनतेला ऊर्जा मिळेल. महाराष्ट्रातून गांधीजींनी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली होती. आजचा कार्यक्रम यासाठी देखील महत्वाचा आहे की, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशातील इतर शहरातही स्थानिक सुविधा वाढवण्यावर भर देत आहे.

हे ही वाचा:

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात

‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’

वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात

देश-विदेशात कुठेही राहिलं असलं तरी लक्ष एकच होतं भारताचं संपूर्ण स्वातंत्र्य. म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याचं स्वरुप लोकलही होतं आणि ग्लोबलही होतं. याच कारणामुळं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानं जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Exit mobile version