27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारण"...आपली बहिण", क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

“…आपली बहिण”, क्रांति रेडकरांचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र

Google News Follow

Related

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांति रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. यावरूनच क्रांति रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. “शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे.. विनोद करून ठेवला आहे.” अशा उद्विग्न भावना क्रांति रेडकर यांनी आपल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.

काय लिहिले आहे क्रांति रेडकर यांच्या पत्रात?

माननीय उद्धव ठाकरे साहेब,
लहानपणा पासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे.. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत…

मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायच सुद्धा नाही.. आमचा कहिही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे.. विनोद करून ठेवला आहे..

हे ही वाचा: 

चीनला रोखण्यासाठी अग्नी-५ सज्ज

अखेर किरण गोसावीला अटक

‘बुलढाणा अर्बन’ ची आयकर विभागामार्फत चौकशी

नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निधीचा प्रवाह

आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले है राजाकारणाचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाहीत पण तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्हीं आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्हीं योग्य तो न्याय करा अशी विनंती.

आपली बहिण, क्रांति रेडकर,

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा