मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे दोन शाळा सोडल्याचे दाखले प्रसिद्ध करत पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. मलिकांच्या या कागदपत्रांच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनीही ट्विटरवर काही मूळ कागदपत्रांमध्ये दुरुस्ती केलेली कागदपत्रे जोडत समीर वानखेडे हे हिंदू महारच असल्याचे सांगितले आहे.

मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे सेंट जोसेफ आणि सेंट पॉल शाळेचे दाखले प्रसिद्ध केले. या शाळेच्या दाखल्यांमध्ये समीर वानखेडे यांच्या धर्म- जात या रकान्यामध्ये धर्म मुस्लिम असा लिहिला असून जातीचा रकाना रिकामा आहे. त्यामुळे पुन्हा समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

महाराष्ट्रात ‘नाचलेल्या’ सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट

गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र

कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!

नवाब मलिकांनी जाहीर केलेल्या कागदपत्रांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी कागदपत्रांमध्ये काही चुका होत्या आणि त्या चुका ज्ञानदेव यांनी १९८९ साली कायदेशीर बाबींची पूर्तता करून दुरुस्त करून घेतल्या आहेत. मनात वाईट विचार असणाऱ्या लोकांनी समीर वानखेडे यांची प्रतिमा खराब करण्यासाठी अशी अर्धवट माहिती प्रसिद्ध केली असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या दुरुस्त केलेल्या चुकांची पडताळणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली असून स्वीकारल्याचेही क्रांती हिने म्हटले आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर अधिकारी समीर वानखेडे हे चर्चेत आले असून त्यांच्यावर अनेक आरोप केले गेले आहेत. त्यानंतर वानखेडे हे एनसीबीकडून होणाऱ्या चौकशीच्या फेऱ्यातही अडकले होते. नवाब मलिक यांनी सर्व कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयात दिली सादर केली आहेत. त्यामुळे न्यायालय यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version