राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे रोज नवनवे आरोप करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना लक्ष्य करत असतात. आज सकाळीच ट्विट करत त्यांनी समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिला लक्ष्य केले आहे. क्रांती रेडकर व एका व्यक्तीमधील कथित चॅटचा फोटो शेअर केला. यावर क्रांती रेडकर हिने ट्विटरवर प्रतिक्रियाही दिली आहे.
हे चॅट्स खोटे असल्याचे क्रांती रेडकर हिने सांगत आपल्या नावाने होत असलेल्या खोट्या आणि बनावट व्हॉट्सअॅप चॅट्सविरोधात मुंबई सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे तिने स्पष्ट केले होते. त्यानुसार क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.
हे ही वाचा:
एमआयएमने पुन्हा दिली मुस्लिम आरक्षणाची बांग! ११ डिसेंबरला मोर्चा!
‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’
घरगुती कामगारांचा एका वर्षात तयार होणार अहवाल
जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!
नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्वीट करत क्रांती रेडकरचं कथित चॅट समोर आणलं होत. या चॅटमध्ये एक व्यक्ती क्रांती हिला नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्यातील संबंधांचे पुरावे देण्याबद्दल बोलत असून त्यावर हे पुरावे दिल्यास तुला बक्षीस दिले जाईल, असे उत्तर क्रांतीने दिले आहे.
नवाब मलिक यांनी चॅट शेअर करताच क्रांती रेडकरनंही त्यावर ट्वीट करत हे चॅट बनावट असून खोट्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. माझे अशा कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे झालेले नाही. पुन्हा एकदा कोणतीही पडताळणी न करता सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी मी लवकरच मुंबई सायबर सेलकडे तक्रार दाखल करणार आहे, असे क्रांती रेडकरने ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, ही आपली भाषा आणि संस्कृती नाही, असेही तिने समर्थकांना म्हटले आहे.
These chats are falsely created and utterly FAKE. I have had no such conversations with anyone EVER. Once again the posts made without verifying. Lodging a complaint MUMBAI CYBER CRIME CELL. Don’t worry supporters this is not our culture or our language too. pic.twitter.com/LL4SS3iaG9
— Kranti Redkar Wankhede (@KrantiRedkar) November 23, 2021