सरपंचांचा दावा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, त्या कोरलाई मधील १९ बंगल्यांचा कर हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर या भरत आहेत. त्यासाठी त्यांनी काही कागदपत्रे देखील दाखवली. मात्र, कोरलाई गावाच्या सरपंचांशी ‘टीव्ही ९’ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत.
ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती आणि १९ बंगले नाही तर १८ घरे बांधली होती असे ते म्हणाले. त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरे तोडली गेली. त्यानंतर २०१४ मध्ये ही जमीन मनिषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन कर भरल्याचे ते म्हणाले. तिथे आता कोणतीही घर नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला कोणताही माफीनामा दिलेला नाही, असे सरपंचांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
अजित डोभाल यांच्या घरात शिरली एक अज्ञात व्यक्ती
संत रविदास जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी भजनात रमले
मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!
‘२५ हजार कोटींचा घोटाळा झाला म्हणताय, मग तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का?’
भाजप नेते किरीट सोमय्या हे आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, घर नाही तर कर कसे भरतात? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचे आहे. तुम्ही जोडे कोणाला मारणार आहात? असा सवाल देखील त्यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. तसेच कर भरल्याची माहिती ही माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवल्याचे त्यांनी सांगितले.