कोकण रेल्वेची धमाकेदार कामगिरी! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

कोकण रेल्वेची धमाकेदार कामगिरी! पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

भारत सरकारचे रेल्वे खाते हे सध्या विद्युतीकरणाच्या दृष्टने मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. रेल्वे खात्यामार्फत मिशन मोडवर या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. रेल्वेच्या माध्यमातून लोकांना पर्यावरणपूरक स्वच्छ आणि हरित प्रकारचा दळणवळणाचा पर्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारचे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने खूप महत्वाचे आणि मोठे पाऊल टाकले आहे

कोकण रेल्वेने शंभर टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य साध्य केले आहे. मंगळवार, २९ मार्च रोजी कोकण रेल्वेमार्फत यासंबंधीची घोषणा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या या कामगिरीसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोकण रेल्वेचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

राणा आयुब यांना विमानतळावर अडवले! १ एप्रिलला होणार ED चौकशी

आदित्य ठाकरे यांच्या सूचनेला बारसू ग्रामस्थांचा विरोध

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

या संपूर्ण विद्युतीकरणाच्या प्रक्रियेचा पाया नोव्हेंबर २०१५ साली रचला गेला. जेव्हा ७४१ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरणाचे काम सुरू झाले. या संपूर्ण कामाचा खर्च १२८७ कोटी इतका आला आहे. यापैकी रत्नागिरी ते थिवीम या स्थानकांमध्ये विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी, २४ मार्च २०२२ रोजी संपन्न झाली आणि २८ मार्च रोजी त्याला प्रमाणपत्रही मिळाले. त्यामुळे आता कोकण रेल्वे ही १००% विद्युतीकरणावर चालणारी रेल्वे बनली आहे.

कोकण रेल्वेच्या या कामगिरीसाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली करत कोकण रेल्वे चे अभिनंदन केले आहे. या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले; “मिशन १००% विद्युतीकरणाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवीन मापदंड स्थापित केल्याबद्दल संपूर्ण कोकण रेल्वे टीमचे अभिनंदन.”

Exit mobile version