महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या घोषणा झाली आहे. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ एप्रिल रोजी या जागेसाठी मतदान पार पडणारा असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते चंद्रकांत जाधव हे कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रभाव केला होता. पण कोरोना काळात त्यांचे निधन झाले. तेव्हा ही जागा रिक्त झाली असून त्यासाठी आता पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी साऱ्याच पक्षांनी चंग बांधला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोणते उमेदवार पाहायला मिळणार याची चर्चा सुरु आहे.
काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीलाच उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकते. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजपाच्या नगरसेविका राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी भाजपकडून पोटनिवडणूक लढवावी असा प्रस्ताव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठेवला होता. पण जयष्टी जाधव यांनी हा प्रस्ताव नाकारला होता.
हे ही वाचा:
भारतविरोधी जिहादसाठी केली जाणार होती मुस्लिम तरुणांची भर्ती
राज्यभर भाजपा आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या नोटिशीची होळी
सोनिया, राहुल, प्रियांका राजीनामा देणार? बातमीने खळबळ
देवेंद्र फडणवीसांची चौकशी सुरु
महाराष्ट्रातील कोल्हापूर सोबतच, बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल येथेही विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये लोकसभा पोटनिवडणूकही होणार आहे. या पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
निवडणुक कार्यक्रम
राजपत्रित अधिसूचना जारी होण्याची तारीख 17 मार्च, 2022, (गुरुवार)
नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2022 (गुरुवार)
अर्जांच्या छाननीची तारीख 25 मार्च, 2022 (शुक्रवार)
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 28 मार्च, 2022 (सोमवार)
मतदानाची तारीख 12 एप्रिल, 2022 (मंगळवार)
मतमोजणीची तारीख 16 एप्रिल, 2022 (शनिवार)