26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणकोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस ? जाणून घ्या

कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस ? जाणून घ्या

Google News Follow

Related

देशभरातील १३ राज्यांमध्ये नवीन राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या झारखंडचे असलेले विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल झाले आहेत. रमेश बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. रमेश बैस हे झारखंडचे १० वे आणि वर्तमान राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत. त्यांनी २०१९ मध्ये त्रिपुराचे १८ वे राज्यपाल म्हणूनही काम केले. रमेश बैस यांनी १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम केले होते.

रमेश बैस यांचा जन्म २ऑगस्ट १९४७ रोजी मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला. त्यांनी भोपाळ येथून बीएससीचे शिक्षण घेतले होते आणि बराच काळ शेती केली होती. रमेश बैस यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नागरी निवडणुकांपासून सुरुवात केली. बैस हे १९७८ मध्ये रायपूर महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि नंतर १९८०मध्ये मंदिर हसोड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, परंतु १९८५ मध्ये पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

रमेश बैस हे भारताच्या १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. ते छत्तीसगडच्या रायपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. बैस १९७८ मध्ये रायपूर महानगरपालिकेत निवडून आले आणि १९८० ते १९८४ पर्यंत मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्यही होते. ते १९८९ मध्ये रायपूर, मध्य प्रदेश येथून ९ व्या लोकसभेवर निवडून आले आणि ११ व्या, १२ व्या, १३ व्या, १४व्या, १५ व्या आणि १६ व्या लोकसभेसाठी पुन्हा निवडून आले.

हे ही वाचा:

रमेश बैस नवे राज्यपाल.. कोश्यारींचा राजीनामा मंजूर

महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उदघाटन

कन्याकुमारी नंतर कर्नाटकात भारतमातेचे दुसरे सर्वात मोठे मंदिर

राजमौलींचा RRR स्पीलबर्गना वाटला भन्नाट
रमेश बैस जुलै २०२१ मध्ये झारखंडचे राज्यपाल बनले. यापूर्वी, ते जुलै २०१९ ते जुलै २०२१ पर्यंत त्रिपुराचे १८ वे राज्यपाल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर बैस यांची २०१९ मध्ये त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

हे ही वाचा:

मुंबईवरून ‘एक्सप्रेस वे’ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली

राष्ट्रवादीला अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे.. पण शरद पवार म्हणाले

फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय

महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय

रमेश बैस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. वाजपेयी सरकारच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळात, बैस यांनी २००४ पर्यंत पोलाद, खाण, रसायने आणि खते, माहिती आणि प्रसारण खाते सांभाळले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा