सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असून शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा यावरही संघर्ष सुरू आहे. दरम्यान, मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या यांनी प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या गोठवलेल्या चिन्हाचं उदाहरण देत शिवसेनेचा विजय कसा होईल, हे सांगितले.
“पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरु होत आहे, या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाली असतील, त्यामुळे धनुष्य बाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आम्हीच जिंकू,” असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मनसुबे, त्यांचे दात- नखं खऱ्या अर्थाने दिसायला लागले आहेत. समोरच्याला चारी मुंड्या चित करायचं, पण लोकशाही पद्धतीने नाही, चिन्हं स्वतःकडे घ्यायचं किंवा गोठवायचं हा त्यांचा इरादा आहे. पण आमच्याकडे चिन्हावर लढवूनही अनेक जण हरलेत. चिन्हं महत्त्वाचंच आहे, माझा न्यायदेवता आणि संविधानावर विश्वास आहे, न्यायालय जो निर्णय देईल, त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे सामोरे जातील,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
“धनुष्य बाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आमच्याकडेच राहील. गाय वासरु नका विसरु हे काँग्रेसचं निवडणूक चिन्ह होतं. ते गोठल्यानंतर हात- सबका विकास सबका साथ निवडणूक चिन्ह मिळालं. त्यानंतर झालेली पहिली निवडणूक काँग्रेस जिंकली होती. त्यामुळे आमचाही विजय होईल अशी खात्री आहे. पण समजा नाहीच मिळालं धनुष्यबाण, तरी सुद्धा चिन्हं मिळेल ते चिन्ह घराघरात पोहोचवून आम्ही जिंकू, हा विश्वास शिवसैनिक, मतदार आणि शिवसेना पक्षप्रमुखांना आहे,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा:
निष्पाप बळी घेणाऱ्या याकुब मेमनच्या कबरीला संगमरवरी फरशी
अमरावतीमधील ‘त्या’ मुलीचा लागला शोध
अमित शहांच्या दौऱ्यावेळी तोतयागिरी करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरु होत आहे, शिवसेना हा खऱ्या अर्थाने पितृपक्षच आहे. पितृपक्षात सगळी पितरं खाली येतात, बाळासाहेबही नक्की खाली असतील आणि आम्ही जिंकू,” असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.