राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी ताकद लावली जात आहे. तसेच शिवसेनेने घोडेबाजार करत असल्याचा आरोप देखील केला आहे. मात्र, ‘घोडेबाजार’ या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणे चूक असून, घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब होते, असे किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. ‘घोडेबाजार’ हा शब्द नेत्यांकडून वारंवार वापरला गेल्यास अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. किशोर जोरगेवार यांनी शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
हे ही वाचा:
हैदराबाद बलात्कार प्रकरणी टीआरएस नेत्याच्या मुलाला अटक
शिक्षकांच्या प्रशिक्षणात गोंधळ; ऑफलाइन प्रशिक्षण घेण्याची मागणी
शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी
धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवालावरून भारताने अमेरिकेला सुनावले
१० मे रोजी निवडणूक होणार आहे. यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात मोठी स्पर्धा आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराची मते महत्त्वाची ठरणार आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे मत कोणाला देणार हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची तीन निर्णायक मते कुणाला मिळणार याबाबत आता चर्चा आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील असे तीन आमदार बहुजन विकास आघाडीकडे आहेत.