उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर बंगल्यांबाबत का बोलत नाहीत?

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर बंगल्यांबाबत का बोलत नाहीत?

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा खळबळजनक व्यक्तव्य करत ठाकरे सरकाला धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच या बंगल्यांबाबत का बोलत आहेत? असे अनेक प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरे यांचे ते १९ बंगले मी बघायला गेलो जे तिथे नव्हते. बहुतेक त्यांचे ते बंगले हरवले आहेत. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावे. बंगले आता मला दिसले नाहीत, मात्र रश्मी ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये पत्रं लिहून माझ्या नावावर बंगले करा असे सांगितले होते. आणि याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी याचे उत्तर द्यावे असे आव्हान सोमय्या यांनी केले आहे.

हे ही वाचा:

चांदीवाल आयोगासमोर नवाब मलिकांचा खुलासा! म्हणाले…

‘यूपी-बिहार वाले भैया’ या चन्नी यांच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल..

‘महिलांचे स्थान सर्वोपरी असलेल्या भारतात हिजाब घालण्याची गरज नाही’

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

हजारो कोविड पेशंटचा बळी घेणाऱ्यांवर ठाकरे का बोलत नाही? कोविड घोटाळ्याच्या माझ्या प्रश्नांना का उत्तर देत नाहीत? अशीही विचारणा सोमय्या यांनी केली आहे. तसेच राऊत यांनी केलेले सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळून लावले आहेत. माझ्याविरोधातील कागदपत्रे असतील तर त्यांनी ती मीडियाला द्यावीत, असे आव्हानही त्यांनी राऊत यांना मीडियाशी संवाद साधताना दिले आहे.

कोविड सेंटर घोटाळ्यातील आरोपींना अटक का करत नाही? गुन्हा का दाखल केला नाही? कोविड सेंटरची कंत्राटे मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र दिली गेली आहेत. कोविड घोटाळ्यामुळे निष्पाप करोना रुग्णांवर अत्याचार झाला, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला.

Exit mobile version