ठरलं.. नवीन वर्षात या ५ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार

किरीट सोमय्या यांचा नवीन धक्का

ठरलं.. नवीन वर्षात या ५ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार

वर्ष संपत संपत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नवीन धक्का दिला आहे. नवीन वर्षात अनेक जण नवीन संकल्प सोडत असतात. सोमय्या यांनी देखील नवीन संकल्प सोडला आहे. त्यानुसार ते नवीन वर्षांमध्ये पाच नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत. सोमय्या यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली आहे. ठाकरे परिवार आणि मुंबई महापालिकेशी संबंधित हे घोटाळे असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

उद्यापासून सुरु होणाऱ्या नवीन वर्षांमध्ये ठाकरे परिवारा, अनिल परब यांना सोमय्या यांनी लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर हे नेते देखील त्यांच्या निशाण्यावर असतील. या सर्व नेत्यांची नावे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये जाहीर केली आहेत. हे सर्व नेते महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी संबंधीत आहेत.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

उद्यापासून नवे वर्ष सुरू होत आहे. या नव्या वर्षात ठाकरे परिवाराचे १९ बंगले, अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए सदनिका याबरोबरच मुंबई महापालिका घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असल्याचे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सोमय्या यांनी सरत्या वर्षात किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट संदर्भात अनेकदा घोटाळ्याचे आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याचा मुद्द्दाही त्यांनी वेळोवेळी उचलून धरला होता. नवीन वर्षातही आता घोटाळेबाज नेत्यांना घाम फोडण्याचा निश्चय सोमय्या यांनी केला आहे.

Exit mobile version