भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या लोकायुक्तांकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील तक्रार दाखल केली आहे. आठ वर्षांपासून अनधिकृत बांधकामावरचा दंड भरला नसल्याची तक्रार सोमय्या यांनी केली आहे. ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांना वाचवत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्या यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ठाण्याच्या विहंग गार्डन परिसरात १३ मजली इमारत सरनाईक यांच्या मालकीच्या कंपनीतर्फे २००७ बांधण्यात आली होती. हे बांधकाम करताना ठाणे महानगरपालिकेच्या एफएसआय नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याबद्दल २०१२ साली महानगरपालिकेने ₹३.३३ कोटींचा दंड देखील ठोठावला होता.
सोमय्या यांनी असेही सांगितले की, सरनाईक यांनी बांधकाम अधिकृत करण्यासाठीचा दंडही भरला नाही, त्यावरचे व्याजही भरले नाही. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार राज्य शासनाने, सरानाईक यांच्यावरील दंड कमी करून त्यांना केवळ १० टक्केच रक्कम भरण्याची मुभा दिली आहे. सरकारतर्फे दंडाच्या एकूण ११ कोटी रूपयांपैकी केवळ २५ लाख भरण्याची मुभा दिली आहे. सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे ५३ पानी तक्रार दाखल केली आहे.
याबद्दल सोमय्या यांनी ट्वीट देखील केले आहे.
प्रताप सरनाईक यांच्या विरोधात लोकायुक्त यांच्या कडे याचिका दाखल करताना डॉ.किरीट सोमैया यांच्या समवेत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे (ठाणे भाजपा अध्यक्ष) आमदार प्रसाद लाड (महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष), नगरसेवक संजय वाघुले (ठाणे महानगरपालिका गटनेते) व अॅड.सुरेश कोलते उपस्थित pic.twitter.com/G01ZtNTT0g
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 10, 2021