मुश्रीफ यांच्या खात्यात ५० कोटी कसे जमा झाले?

किरीट सोमय्या त्यांचा प्रहार

मुश्रीफ यांच्या खात्यात ५० कोटी कसे जमा झाले?

मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापे टाकले आहेत, घोटाळ्याबाबत का बोलत नाहीत? ४९ कोटी ८५ लाख रुपये मुश्रीफ साहेब यांच्या खात्यात कसे जमा झाले? अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून हे पैसे कसे काय जमा होतात असा जोरदार प्रहार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. सोमय्या हे कोल्हापूर येथे आहेत . कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेतल्यावर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली.

ग्रामपंचायतने जावयाच्या कंपनीला ५० हजार रुपये देण्याचा आदेश का काढला होता? ४९ कोटी ८५ लाख रुपये मुश्रीफ साहेब यांच्या खात्यात कसे जमा झाले? हे कोल्हापूर जनतेला देखील कळलं तर कोल्हापूरकर आयुष्यभर नव्हे सात जन्म नमस्कार करतील असा जोरदार टोला सोमय्या यांनी मुश्रीफ यांना लगावला.

रजत प्राव्हेट लिमिटेड, माऊंट प्रायव्हेट लिमिटेडचा मुश्रीफ साहेब यांच्या कंपन्याशी काय संबंध आहे? अस्तित्वात नसणाऱ्या कंपनीमार्फत ४९कोटी ८५ लाख रुपये कसे मिळतात? हे मुश्रीफ यांनी सांगावं. कंपनीमार्फत चेक दिला जातो, त्यानंतर मुश्रीफ यांच्यामार्फत तो चेक बँकेत जमा केला गेला. मुश्रीफ यांनी आपल्या जावायामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला ५०हजार रुपये देण्याचा जीआर काढला होता. तो जीआर रद्द केला असं सांगितले जाते, अरे पण तुम्ही त्याला ठेका दिला होता की नाही हे सांगा. यामुळे दरवर्षी राज्यातील ग्रामपंचायतीना १५० कोटींचा दणका बसणार होता. हे कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं या सगळ्याची चौकशी होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मुंबईकरांना विक्रमी हुडह

शर्मिला ठाकरे यांची उर्फी प्रकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया

देशातील दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट

भाजप मिशन २०२४ साठी रणनीती आखणार

ग्रामविकास मंत्री असताना जावयासाठी ग्रामपंचायतींना झिझिया कर लावला गेला. मुश्रीफ कोणाला मूर्ख बनवत आहेत? कंत्राट रद्द केलं म्हणतात. पण आधी दिलं तर होत ना? मी प्रकरण बाहेर काढल्यानंतर कंत्राट रद्द केलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले असल्याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले.

Exit mobile version