किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये

किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये

“भाजपाचे चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात ₹१.२५ चा मानहानीचा खटला दाखल करतील कारण त्यांचे मूल्य सव्वा रुपया आहे. ठाकरे सरकारचे नेते माझ्या विरोधात बदनामी झाली म्हणून ₹५५० कोटींचे  खटले दाखल करतात. त्याचा अर्थ काय? भाजपा किरीट सोमय्या यांचे मूल्य ₹५५० कोटी आहे.” असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावण्याचे जाहीर केेले आहे. पाटील यांच्या विरोधात संजय राऊत मानहानीचा दावा दाखल करणार आहेत आणि तो देखील तब्बल सव्वा रूपयाचा! याच प्रकरणाचा दाखला देत किरीट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारला घेरले आहे.

मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना लक्ष्य करण्यात आले होते. ‘तोंडास फेस कोणाच्या’ या मथळ्याखाली हा अग्रलेख लिहीला होता.

या टीकेला उत्तर देणारा लेख चंद्रकांत पाटील यांनी आज म्हणजेच बुधवार, २१ सप्टेंबर रोजी लिहीला आहे. सामनाच्या संपादकीय पानावर तो छापून आला आहे. या लेखातून चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर चांगलेच टीकास्त्र डागले आहे.

हे ही वाचा:

बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी

नवज्योत सिद्धू मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी कोणतेही बलिदान द्यायला मी तयार

परमबीर हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आणखी एक समन्स

जाऊबाई जोरात, मग पोलिसांनी काढली वरात!

या लेखात राऊत यांच्या पत्नीवर झालेल्या पीएमसी घोटाळ्याच्या आरोपांचा संदर्भ पाटील यांनी दिला आहे. पाटलांचा हा वार शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना चागलाच जिव्हारी लागला आहे. यावरूनच संजय राऊत यांनी येत्या चार दिवसांत चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवून सव्वा रूपयाचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे.

किरीट सोमैय्या यांनी गेले काही आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या घोटाळ्यांचा सपाट लावला आहे. सोमैय्यांनी केलेल्या आरोपांवर अनेक मंत्र्यांनी अब्रू नुकसानीचे दवे ठोकले आहेत. या सर्व डाव्यांची किंमत ₹५५० कोटी झालेली आहे.

Exit mobile version