भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या २७ आणि २८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौरा करणार आहेत. ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यापासून ते मागे हटणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.
अलिबाग हून निघालो
माझ्या मुलुंड निवासस्थानी येथे आईचे आशीर्वाद घेईल
दुपारी 1.45 वाजता निघणार
२.४५ वाजता सिद्धिविनायक मंदिर गणपती दर्शन (बाहेरून)
3 वा. कोल्हापूर यात्रेची शुरुआत
२८ सप्टेंबर महालक्ष्मी मंदिर (आंबेबाई दर्शन)
मुरगूड पोलीस स्टेशन कागल येथे तक्रार दाखल करणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 27, 2021
गेल्या आठवड्यात सोमैय्यांना त्यांच्या मुंबईतील घरात आणि नंतर कराड जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे कारण देत त्यांच्या जिल्ह्यात प्रवेश बंदीचा आदेश जारी केला होता.
सोमैय्या म्हणाले, “मी मुश्रीफ यांच्याविरोधात, सर सेनापती साखर कारखाना आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज साखर कारखाना या दोन साखर कारखान्यांमध्ये फसवणूक केल्याबद्दल तक्रार दाखल करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातील मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाईल.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री मुश्रीफ कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांना भेट न देण्याची धमकी दिली होती. मुरुड कागल महानगरपालिकेने सोमय्या यांना कोल्हापुरात प्रवेश करण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारा ठराव मंजूर केला होता. सोमय्या यांनी सोमवारी राज्य सरकारला कोल्हापूरला येण्यापासून रोखण्याचे आवाहन केले होते.
हे ही वाचा:
लोकल रेल्वे बंद; मग शाळेत जायचे तरी कसे?
योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार! सात नव्या चेहऱ्यांना संधी
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल
“मुलुंड येथील निलम नगर निवासस्थानी माझ्या आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर मी दादरच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देईन. दुपारी ३ वाजता मी माझी कोल्हापूर यात्रा प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरापासून सुरू करेन, असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.