किरीट सोमैय्यानी दिला इशारा
अमरावतीत झालेली जाळपोळ, दगडफेक आणि दंगलीनंतर तिथे जाण्यापासून परावृत्त करण्यात आल्यानंतर आता किरीट सोमय्या अमरावतीत दाखल झाले. जेव्हा दंगल झाली तेव्हा मला तिथे जायचे होते, पण तेव्हा मला येऊ दिले नाही. त्यामुळे मी आता आलो आहे, असे सोमैय्या म्हणाले. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांबाबत पुनरुच्चार केला आणि नवे घोटाळे लोकांसमोर आणणार असल्याचेही सांगितले.
गेल्या १२ महिन्यांत १०० घोटाळे समोर आलेत. त्यात २४ मोठे घोटाळे आहेत. ठाकरे सरकारचे अर्धा डझन मंत्री अधिकारी, नेते जेलमध्ये किंवा बेलवर आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत ४० घोटाळे लोकांसमोर आम्ही उघडकीस आणू. पुढच्या काही दिवसांत ठाकरे सरकारच्या चार मंत्र्यांच्या तक्रारी विविध संस्थांना केलेल्या आहेत. ज्यामध्ये दोन शिवसेनेचे आहेत. एक मुख्यमंत्री मित्र परिवाराचा महत्त्वाचा सदस्य आहे. दुसरा वर्णन करत नाही. दोन्ही मुख्यमंत्री मित्र परिवारातील सदस्य आहेत. एक कॅबिनेट मंत्री आहेत. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसच्या विदर्भातील मंत्र्यांचा पण नंबर आहे. त्यांची पण फाईल आली आहे. एजन्सीकडे तक्रारी कागदपत्रांसह पाठवल्या आहेत. चौथे एनसीपीचे आहेत. उद्या मी जालनाला जाणार आहे. खोतकरांचा साखर घोटाळा बाहेर आला आहे. एपीएमसी घोटाळा केला करोडो रुपये लुटले आम्ही ती माहिती देणार आहोत.
हे ही वाचा:
‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’
बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक
शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून
१२ नोव्हेंबरच्या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे. कुठे मशीद पेटविण्यात आली? कुणी अफवा पसरवली? का उद्धव ठाकरे ते शोधत नाहीत. पोलिसांना सूचना देण्यात आली होती की हे होऊ द्या. मला यायचं होतं. अजब सरकार आहे. हसन मुश्रीफप्रकरणी मला कोल्हापूरला जायचं होतं तर मला प्रतिबंध होतो. अमरावतीतही प्रतिबंध. १९९२मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना जे झालं त्याची पुनरावृत्ती उद्धव ठाकरे करत आहेत. हिंदूंवर जर परत हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ठाकरे सरकारची असेल. रझा अकादमी व इतरांचे जी आंदोलने झाली त्याची चौकशी व्हायला हवी. मी अमरावतीत हनुमान मंदिरातील पुजाऱ्यांना भेटलो. उद्धव ठाकरे व पवारांचे सरकार घोटाळे बाहेर आले की सोमय्याला थांबवतात. हिंदूवर अत्याचार झाले त्यावेळीही मला रोखतात.