भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांचा कोल्हापूर दौरा निश्चित झाला आहे. सोमवार, २७ सप्टेंबर रोजी किरीट सोमैय्या कोल्हापूरच्या दिशेने कूच करणार असून मंगळवारी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी ते कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत. त्यावेळी ते कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला भेट देणार आहेत.
किरीट सोमैय्या हे सोमवार, २७ सप्टेंबर रोजी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन कोल्हापूरकडे मोटारीने रवाना होणार आहेत. वाटेत पनवेल, खोपोली लोणावळा, पुणे अशा विविध ठिकाणी स्वागत स्वीकारत ते सातारा येथे पोहोचणार आहेत. तर सातारा येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी ते कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत. कोल्हापूरमध्ये ते अंबाबाई मंदिराचे दर्शन घेऊन कागल येथील संताजी घोरपडे साखर कारखान्याला भेट देणार आहेत. तर त्याआधी सोमैय्या हे मुरगूड पोलिस स्थानकातही ते जाणार आहेत. कोल्हापूर मधील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम झाल्यावर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. सोमय्या यांनी ट्विटरवरून आपला हा बहुचर्चित कोल्हापूर दौरा जाहीर केला आहे.
माझी कोल्हापूरची यात्रा 27 सप्टेंबर दुपारी 3 वाजता सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी पासून सुरू होईल आणि 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महालक्ष्मी अंबे माता मंदिर कोल्हापूर येथे पोहोचेल व तिथून मुरुगुड कागल पोलीस स्टेशन ला जाणार @BJP4Maharashtra pic.twitter.com/bAvUkdTC9g
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 25, 2021
हे ही वाचा:
… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन!
पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!
भारतातील ‘हे’ रेल्वे स्थानक चालते १००% सौर उर्जेवर!
आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!
किरीट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. तर मुश्रीफ यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ते कोल्हापूर येथे जाऊन साखर कारखान्याला भेट देणार होते. गेल्याच आठवड्यात सोमैय्यांचा हा कार्यक्रम निश्चित झाला होता. पण त्यावेळी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमैय्या यांना जिल्ह्यात प्रवेश बंदी जाहीर केल्यामुळे हा दौरा चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सोमैय्या यांना आधी त्यांच्या राहत्या घरी आणि नंतर मुंबई रेल्वे स्थानकावर अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. अखेर सातारा येथे सोमैय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यापासून अडवले गेले. तेव्हाच सोमय्या यांनी आपण लवकरच पुन्हा एकदा कोल्हापूरला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता त्यांचा हा सुधारित कोल्हापूर दौरा निश्चित झाला आहे.