उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?

उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या हे ठाकरे सरकार विरोधात त्यामुळे आक्रमक झालेले असतात. सध्या ते शिवसेना नेते, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. दापोली येथे असलेले अनिल परब यांचे साई रिसॉर्ट अनधिकृत असून ते तोडण्यासाठी सोमैय्यांनी ‘चलो दापोली’ ची हाक दिली आहे.

उद्या म्हणजेच शनिवार, २६ मार्च रोजी किरीट सोमैय्या दापोली साठी रवाना होत आहेत. मुलुंड येथील नीलम नगर मधील आपल्या निवासस्थानाहून ते दापोलीसाठी प्रयाण करतील. आपल्या या दौऱ्याचा संपूर्ण वेळापत्रक सोमैय्या यांनी ट्विटरवर शेअर केले आहे अनिल परबचे भ्रष्ट रिसॉर्ट तोडूया असे म्हणत पुन्हा एकदा सोमैय्यांनी चलो दापोलीचा नारा दिला आहे.

हे ही वाचा:

‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो कायदेश्वर’

‘कोरोना काळात शालेय शिक्षणासाठी फी कमी न करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य’

मिलिंद खेतले यांना राष्ट्रपती वैशिष्टपुर्वक सेवा पदक

“मैं आदित्यनाथ योगी…” दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री म्हणून शपथ

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या अनिल परब यांचे हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून हे रिसॉर्ट एका शेतजमिनीवर बांधले असल्याचे सोमैय्या यांचे म्हणणे होते. त्यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तर केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) परब यांच्या रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेडच्या उल्लंघनाची सखोल चौकशी झाली होती.

त्यानंतर हे रिसॉर्ट पाडण्यासाठी परब यांना नोटीस बजावण्यात आली होती. पण तरीही अद्याप हे रिसॉर्ट पडले गेले नाहीये. त्यामुळेच आता सोमैय्या यांनी चलो दापोलीचे घोषणा दिली आहे. त्यामुळे आता उद्या २६ मार्चला काय होणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. सोमैय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दापोली येथे परिस्थिती चिघळण्याचीही शक्यता आहे.

Exit mobile version