काल संध्याकाळपासून महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय नाट्य न संपता आणखीन तीव्र होताना दिसत आहे. भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या कोल्हापूरमध्ये दाखल होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. पण तरीही हा लढा अद्याप संपला नसून दोन दिवसांनी आपण कोल्हापुरात जाणार असल्याचे सोमैय्या यांनी सांगितले आहे. तर आज म्हणजेच सोमवार २० सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफ यांचा आणखीन एक घोटाळा आपण उघडकीस आणणार असल्याचे सोमैय्या यांनी जाहीर केले आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेल्या किरिट सोमैया यांना कराड स्थानकावर उतरवण्यात आले आहे. रात्री दोन वाजायच्या सुमारास सोमैय्या यांना कराड येथे उतरण्यासाठी मनवण्यात पोलिसांना यश आले आहे. तर सोमैय्या यांना कराड येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. सोमैय्या यांनी आज कोल्हापूरला न जाण्याचे मान्य केले आहे. सोमैय्या हे आजच पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. पण त्याआधी कराड येथे सोमैय्या पत्रकार परिषद घेणार आहेत.
हे ही वाचा:
जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?
किरीट सोमैय्या यांना कराडमध्ये केले स्थानबद्ध
रॉयटर्स म्हणाले, पंतप्रधानांनी वाढदिवशी अमूल्य भेट देशाला दिली!
किरीट सोमैय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे. तर ९ वाजता कराड येथून सोमैय्या पत्रकार परिषदही घेणार आहेत. यावेळी किरीट सोमैय्या हे अधिक आक्रमक झाले आहेत. हसन मुश्रीफ यांचा आणखीन एक घोटाळा आपण उघडकीस आणणार असल्याचे सोमैय्या यांनी जाहीर केले आहे.
सोमैय्या यांच्या या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सोमैय्या आता मुश्रिफांवर कोणते नवे आरोप करणारा याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. सोमैय्या यांनी सुरवातीला केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुश्रीफ आधीच बिथरलेले दिसत आहेत. त्यात आता सोमैय्या यांनी आणखीन एक नवीन घोटाळा बाहेर काढण्याचे जाहीर केल्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.