राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही सत्ताधारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण करत असल्याचा आरोप केला आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, काही सत्ताधारी नेते स्वतःच राजकीय वजन वाढवण्यासाठी, तसेच आर्थिक कमाईसाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत भीती निर्माण केली जात आहे. लॉकडाऊन सारख्या धमक्या देऊन लोकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावं.
पुढे ते हेही म्हणाले की, ओमिक्रॉनच्या जवळपास ९५ टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज नाही आहे. दोन ते चार दिवसात रुग्ण बरे होत आहेत. खूप कमी लोक कोमॉर्बीटी आहेत आणि त्यांनी काळजी घ्यायची गरज आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये असे ते म्हणाले.
सोमय्या यांनी हात जोडून हे सर्व थांबवण्याची विनंती केली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात मागील २४ तासात तब्बल ३६ हजारपेक्षा अधिक रुग्णाची नोंद झाली. प्रामुख्याने मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. एकट्या मुंबई शहरात मागील २४ तासात १५ हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.
हे ही वाचा:
ट्विटरवर गाजला मराठी राबडी देवी हॅशटॅग
मराठीतून शिक्षण घेतलेल्या १५० उमेदवारांना तात्काळ शिक्षकपदी नियुक्त करा!
‘रावणासारखे १० तोंडानी बोलणारे आणि चालणारे हे सरकार’
‘काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काहीही वाकडे करु शकणार नाहीत’
कोरोनाच्या ओमायक्रोन प्रकारची भारतात दहशत पसरत आहे. तर देशात कालच्या दिवसात १ लाख १७ हजार रुग्ण आढळले आहेत. बुधवारच्या तुलनेत तब्बल २८ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.