25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणमिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबचे रिसॉर्ट तुटणार

मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबचे रिसॉर्ट तुटणार

Google News Follow

Related

मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबने रिसॉर्ट तुटणार असा इशारा भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. यावेळी सोमैय्या यांनी पुन्हा एकदा ‘चलो दापोली’ चा नारा दिला आहे. रविवार, २० मार्च रोजी सोमैय्या यांनी हे ट्विट केले आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी सोमैय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात ट्विट करत हल्ला चढवला आहे.

या आधी शनिवार, १९ मार्च रोजी किरीट सोमैय्या यांनी या विषयात पाहिल्यांदा ट्विट करताना अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडायला चलो दापोली असे म्हटले होते. शनिवार, तर त्यानंतर आता पुन्हा सोमैय्यांनी या विषयात भाष्य केले आहे. २६ मार्चला किरीट सोमैय्या हे दापोलीला जाणार आहेत. तर सोमैय्या यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक भाजपा कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक दापोलीत दाखल होऊ शकतात. त्यामुळे आता या विषयावरून राज्यात नवा राजकीय संघर्ष उभा राहणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

कलम ३७० पुन्हा लागू करा…शिवसेनेची मागणी

‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’

‘२४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केली’

गेल्या काही महिन्यांपासून भाजपा नेते किरीट सोमैय्या हे अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या अनिल परब यांचे दापोली येथील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट एका शेतजमिनीवर बांधले असल्याचे सोमैय्या यांचे म्हणणे होते.

त्यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तर केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) परब यांच्या रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेडच्या उल्लंघनाची सखोल चौकशी झाली होती आणि हे रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण तरीदेखील अद्याप हे रिसॉर्ट तोडण्यात आलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा