ठाकरे सरकारची तंतरली! किरीट सोमैय्यांना कोल्हापुरात प्रवेशबंदी

ठाकरे सरकारची तंतरली! किरीट सोमैय्यांना कोल्हापुरात प्रवेशबंदी

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारची पळता भुई थोडी केली आहे. सोमैय्या हे एका मागोमाग एक ठाकरे सरकारच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप करत असून नुकतेच त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला होता. तर सोमवार २० सप्टेंबर रोजी ते कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या कथित बेनामी कारखान्याला भेट देणार होते. पण किरीट सोमैय्या यांच्या कोल्हापूर भेटीने ठाकरे सरकारचे चांगले धाबे दणाणले आहेत. सोमैय्या यांना कोल्हापूरमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली असून किरीट सोमैय्या मुंबईतून बाहेर पडू नये याची पूर्ण खबरदारी सरकार मार्फत घेतली जात आहे. मुलुंड येथील सोमैय्या यांच्या निवासस्थानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

सोमवार २० सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे जाऊन हसन मुश्रीफ यांच्या कथित बेनामी कारखान्याला भेट देणार असल्याचे सोमैय्या यांनी जाहीर केले होते. १९ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील गिरगाव चौपटी येथे जाऊन गणेश विसर्जनाचा लाभ घेऊन महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात दाखल होणार होते.

हे ही वाचा:

उल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास…घडली आणखी एक घटना!

लालपरीचे उत्पन्न १२ कोटी, खर्च २५ कोटी

धक्कादायक! वापरलेले तेल पुन्हा विकले जात आहे रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी

पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

अशातच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमैय्या यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी नोटीस बजावली आहे. नोटीस देण्यासाठी मुंबई पोलिसांचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानी आले. पण त्यावेळी पोलिसांचा एवढा फौजफाटा त्यांच्या घराबाहेल आणला आहे की त्यांच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

किरीट सोमैय्या यांना मुलुंडमधील त्यांच्या निलम नगर येथील निवासस्थानाच्या परिसरातूनही बाहेर पडू दिले जात नाहीये. यावरून ठाकरे सरकारच्या कारभारावर चांगलीच टीका होताना दिसत आहे.

या कारवाई वरून सोमैय्या यांनी हल्लाबोल केला आहे. “मला कोल्हापुरात प्रवेश बंदी आहे तर मुंबईत बंदोबस्त का लावला? मला गणपती विसर्जनाला ठाकरे सरकार जाऊ देत नाहीये. घराबाहेर पडू दिले जात नाहीये.” असा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. तर गिरगाव चौपटीला जाऊन पुढे महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात दाखल होण्याचा सोमैय्या यांचा निर्धार कायम आहे.

Exit mobile version