30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणकिरीट सोमैय्या कोल्हापूरमध्ये दाखल होणार?

किरीट सोमैय्या कोल्हापूरमध्ये दाखल होणार?

Google News Follow

Related

दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या हे कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. पण तरीही त्यांना पोलीस कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात असे सांगितले जात आहे. खुद्द सोमैय्या यांनी तशी शंका व्यक्त केली आहे. ठाकरे सरकार मला कोल्हापूरपर्यंत पोहोचू देणार नाहीत असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.

सोमवार २० सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे जाऊन हसन मुश्रीफ यांच्या कथित बेनामी कारखान्याला भेट देणार असल्याचे सोमैय्या यांनी जाहीर केले होते. १९ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील गिरगाव चौपटी येथे जाऊन गणेश विसर्जनाचा लाभ घेऊन महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात दाखल होण्याचा सोमैय्या यांचा कार्यक्रम ठरला होता. पण या दौऱ्या आधीच सोमैय्या यांना कोल्हापुरात प्रवेशबंदी असल्याचे आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

हे ही वाचा:

उल्हासनगर कायदा-सुव्यवस्थेच्या नावाने उल्हास…घडली आणखी एक घटना!

लालपरीचे उत्पन्न १२ कोटी, खर्च २५ कोटी

धक्कादायक! वापरलेले तेल पुन्हा विकले जात आहे रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविण्यासाठी

पंजाबमध्ये ‘पंजा’चा गोंधळ सुरूच! सुखजिंदर रंधावांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत

यावरूनच सोमैय्यांना रोखण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी केला. आधी सोमैय्या यांना त्यांच्या घरात डांबून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर नंतर मुंबई पोलिसांनी सोमैय्यांना महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये चढण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. पण या मुस्काटदाबीला न जुमानता सोमैय्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसून कोल्हापूरकडे रवाना झाले.

कोल्हापूरच्या वाटेत एखाद्या रेल्वे स्टेशनवर पोलिस सोमैय्यांना ताब्यात घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात होता. पण अद्याप तरी असे घडलेले नाही. त्यामुळे २० सप्टेंबरला सोमैय्या कोल्हापूरमध्ये प्रवेश करणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा