हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्याबाबत ईडीकडे दिल्यानंतर आज त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र दिली आहे. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि परिवाराने बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. तसंच हसन मुश्रिफ यांना एक इशारा द्यायलाही सोमय्या विसरले नाहीत.

ज्या बेनामी कंपन्यांकडून त्यांनी किती पैसे घेतले. ते कुठे ट्रान्सफर केले, त्याचा ऑडिट रिपोर्ट आज किरीय सोमय्या यांनी ईडीला दिला. काही दिवसांपूर्वी सर सेनापती कागलमधील कारखान्याची माहिती दिली होती. आज आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याबाबत माहिती दिली आहे. या कारखान्यात १०० कोटी रुपये कशाप्रकारे आले? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी केलाय. ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत त्याच्या नावानं बँकेत खाते उडलं आणि त्यातून कारखान्यात पैसे आले. आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला. राज्य सरकारकडूनही ब्रिक्स इंडियाला मदत करण्याचे आदेश देण्यात आले, या सगळ्या प्रकाराचा सातबारा आपण ईडीला दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

ब्रिक्स इंडिया ही हसन मुश्रीफ परिवाराची बेनामी कंपनी आहे. हजार कोटी नाहीतर एक लाख कोटीचा दावा दाखल करा. पण मी सांगतो की हसन मुश्रीफ आणि परिवार यांनी घोटाळ्याचा पैसा बेनामी कंपन्या, शेल कंपनीकडून या दोन कारखान्यात गुंतवणूक केली. त्याबाबत तपास सुरु आहे. या तपासाला गती मिळावी यासाठी ईडीला कागदपत्र दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा

भारतीय लसवंतांविरुद्ध ब्रिटनचा वर्णद्वेषी निर्णय

दरम्यान, सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्याबाबत विचारलं असता हसन मुश्रीफांवर क्रिमिनल कारवाई करायची असेल तर मला कागलमध्ये तक्रार द्यावी लागेल. एक एफआयआर झाला की अन्य तपास यंत्रणांना मदत होते. पण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शलरद पवार यांच्या मार्गदर्शनाथाली मला सात तास घरी कोंडून ठेवलं. सीएसएमटीवर खोटी नोटीस दाखवली. त्यामुळे एफआयआर जरी काही दिवस थांबला असला तरी किरीट सोमय्या थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.

Exit mobile version