हिम्मत असेल तर यावेळी माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, सोमैय्यांचे आव्हान

हिम्मत असेल तर यावेळी माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, सोमैय्यांचे आव्हान

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. ‘हिम्मत असेल तर यावेळी माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा’ असे म्हणत सोमैय्या यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या ‘रोखठोक’ ला ही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘जर विरोधी पक्षात जोर नाही आणि किरीट सोमैय्या यांची हास्य जत्रा आहे तर मग सामनामधून किरीट सोमैय्यांची दखल का घेता?’ असा सवाल किरीट सोमैय्या यांनी केला आहे. तर किरीट सोमैय्या यांच्या कोल्हापूर दौर्‍यात अडवणूक करणे गैर आहे असे स्वतः शरद पवार सांगतात तर मुख्यमंत्री कार्यालयाला स्पष्टीकरण द्यावे लागते की दौरा अडवला हे आम्हाला माहीतच नव्हते. हे सारे अत्यंत चुकीचं आहे असे सोमैय्या म्हणाले. तर किरीट सोमैय्या यांचा दौरा सरकारला अडवावा का लागतो? असा सवालही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार

पालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे

अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व

उद्यापासून म्हणजेच सोमवार, २७ सप्टेंबर पासून सोमैय्या हे कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. दुपारी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेऊन सोमैय्या मोटारीने कोल्हापूरसाठी रवाना होणार आहेत. तर मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी ते कोल्हापूरमध्ये दाखल होतील. यावेळी ते ठाकरे सरकार मधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करणार आहेत. सोमैय्या यांनी मुश्रीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्याच्याशी संबंधीतच त्यांचा हा कोल्हापूर दौरा निश्चित झाला आहे.

Exit mobile version