‘रश्मी ठाकरे यांनी सरपंचांना बंगले नावावर करण्यासाठी लिहिले होते पत्र’

‘रश्मी ठाकरे यांनी सरपंचांना बंगले नावावर करण्यासाठी लिहिले होते पत्र’

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावच्या सरपंचांना पत्र लिहून बंगले आपल्या नावावर करण्याची मागणी केल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केले.

किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, रश्मी ठाकरे यांनीच संरपंचाला पत्र लिहिले असल्यामुळे कोण फसवणूक करत आहे, हे स्पष्ट होते.

किरीट सोमय्या यांनी स्क्रीनवर या पत्रासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी म्हटले की, २ फेब्रुवारी २०१९ला रश्मी ठाकरे यांनी हे पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले होते की, ही मिळकत आम्ही अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केली होती. आम्ही मिळकत खरेदी केल्यानंतर तिथे बंगले व घरे नव्हती. त्यामुळे फोर्जरी कोण करत आहे, मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत, असे सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

राणेंच्या ‘अधिश’वर पुन्हा महापालिकेचं पथक दाखल  

‘आमदार रमेश बोरनारेंचा राजीनामा घ्या’

लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेवर आज सुनावणी

 

१९ बंगल्यांबाबत राऊत बोलतात, उद्धव ठाकरे का बोलत नाहीत, असा सवाल विचारत सोमय्या म्हणाले की, २३ मे २०१९ आणि जानेवारी २०१९ला रश्मी ठाकरे यांनी कोर्लई सरपंचांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी म्हटले होते की, आम्ही ३० एप्रिल २०१४ला जमिनीचे मालक अन्वय नाईक यांच्या जागा खरेदी केल्या असून त्यावरील घरे आमच्या नावावर केल्यास आम्ही आपले ऋणी राहू. हे पत्र सरपंचांनी स्वीकारलेलेही आहे. तशी सही त्या पत्रावर आहे. पण नंतर २ फेब्रुवारीला रश्मी ठाकरे यांनी सरपंचांना पत्र लिहून त्या जमिनीवर बंगले नसल्याचे म्हटले आहे. मग यात खोटे कोण बोलत आहे, असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला.

Exit mobile version