चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया

चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया

भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी चालो दापोलीचा नारा दिला आहे. २६ मार्च रोजी दापोली येथे जाण्यासाठी सोमैय्या यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे आता मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महाराष्ट्रात काही नवा राजकीय वाद पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैय्या हे गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना नेते अनिल परब यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत.सोमैय्या यांनी परबांच्या दापोली येथील रिसॉर्ट संदर्भात तक्रार केली होती. तर नंतर अनिल परब यांच्या रिसॉर्टचा सातबारा समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला होता.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

 

एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या अनिल परब यांचे हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून हे रिसॉर्ट एका शेतजमिनीवर बांधले असल्याचे सोमैय्या यांचे म्हणणे होते. त्यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तर केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) परब यांच्या रिसॉर्टच्या बांधकामात सीआरझेडच्या उल्लंघनाची सखोल चौकशी झाली होती.

त्यानंतर हे रिसॉर्ट पाडण्यासाठी परब यांना नोटीस बजावण्यात आली होती. पण तरीही अद्याप हे रिसॉर्ट पडले गेले नाहीये. त्यामुळेच आता सोमैय्या यांनी चलो दापोलीचे घोषणा दिली आहे. त्यामुळे आता २६ मार्चला काय होणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version