किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंचे ‘पार्टनर’

अनधिकृत पंचतारांकित हॉटेल्या बांधकामासंदर्भात करणार तक्रार

किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंचे ‘पार्टनर’

उद्धव ठाकरेच नव्हेत तर त्यांचे निकटवर्तीय अनिल परब, संजय राऊत यांच्यावर विविध घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यानी आता रवींद्र वायकर यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल अनधिकृतरित्या बांधल्याचा हा आरोप आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. यापूर्वीही वायकर यांच्यावर सोमय्या यांनी आरोप केला होता. महाकाली गुंफेमध्ये रवींद्र वायकर यांनी घोटाळा केल्याचा तो आरोप होता. तेव्हा सोमय्या म्हणाले होते की, हा ५०० कोटींचा हा घोटाळा आहे. महाकाली गुंफेसाठी ५०० कोटी बिल्डरला दिले आणि या बिल्डरांमध्ये अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांचा समावेश आहे.

सोमय्या यांनी म्हटले आहे की, मी आझाद मैदान पोलिस ठाण्यात ११ मार्चला संध्याकाळी ४ वाजता तक्रार दाखल करणार आहे. उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांच्याविरोधात आपण ही तक्रार करणार असून त्यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. पालिकेची जागा आणि जोगेश्वरीतील एक उद्यान हडप करून त्यांनी तिथे पंचतारांकित हॉटेल बांधले आहे. त्याविरोधात ही तक्रार करणार आहे.

हे ही वाचा:

हसत खेळत सतिश कौशिकची एक्झिट…

आगामी निवडणुकांसाठी पंचामृत!

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५,१५० इलेक्ट्रीक बसेस

तब्बल ३६,००० कोटींचा डोस.. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार

यासंदर्भात वायकर यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी घेतली तेव्हा ते संतापले. हा मनुष्य फ्रॉड आहे ब्लॅकमेलर आहे. कोरलाईच्या ठिकाणी जागेवर बंगले नव्हते. पण त्यांनी सांगितले की बंगले होते. आपणही सोमय्या यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी अनिल परब यांच्यावर दापोलीतील रिसॉर्टच्या बाबत सोमय्या यांनी तक्रार केली होती. संजय राऊत यांच्यावरही मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात त्यांनी आरोप केले आहेत. कोविड सेंटरमध्ये १०० कोटींचा घोटाळा झआल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यात संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांचा सहभाग असल्याचा आरोप होता. त्याबाबतही त्यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधातही त्यांनी तक्रार केली होती. एसआरए स्कीममध्ये तीन फ्लॅट हडप केल्याचा आरोप सोमय्या यांनी पेडणेकर यांच्यावर केला होता.

Exit mobile version