भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी आता थेट शिवसेनेचे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना निशाण्यावर घेतले आहे. किरीट सोमैय्या यांनी आज ‘टीव्ही ९’शी संवाद साधला त्यावेळी ते यशवंत जाधव यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.
यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली असून त्या संबंधित आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. यशवंत जाधव यांची अवस्था चोर मचाये शोर अशी झाली आहे, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. तसेच सोमवारपासून यशवंत जाधव यांच्या चौकशीला गती देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सोमैय्या यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?
एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार
चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?
‘पुणेकरांच्या मनात केवळ आणि केवळ भाजपा आहे’
दरम्यान, मराठवाड्यातील चार नेत्यांचा घोटाळा उघड करणार असल्याचेही सोमैय्या यांनी सांगितले. मराठवाड्यातील चार नेत्यांनी तब्बल २० कोटी रुपये बिटकॉईनमध्ये गुंतवले आहेत, असे त्यांनी सांगितलं. बिटकॉईनच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचेही सोमैय्या यांनी सांगितले. तसेच सोमवारी ईडी कार्यालयात जाणार असून या प्रकरणाची माहिती ईडी चेअरमन आणि केंद्रीय अर्थ खात्याला देणार आहे, असे किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे.
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नेत्यांचे एजंट समोर आले आहेत. त्यामुळे यातून खूप काही समोर येणार आहे. ठाकरे सरकारमधील अनेक नेते आणि अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. परमबीर सिंग यांना निलंबितकेले तसे या आरोप असलेल्या नेत्यांनाही निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली.