तीनशे वर्षे प्राचीन कर्जत येथील वैजनाथ देवस्थानची जमीन सलीम बिलाखीयाच्या नावाने हस्तांतरीत करून पुढे ती ठाकरे सरकारच्या एका मोठा नेत्याच्या परिवाराच्या नावाने ७/१२ करण्यात आला. अशी तक्रार भाजप नेते किरीट सौमय्या यांनी मागच्या आठवड्यात कर्जत येथील तलाठी व तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत उद्या किरीट सौमय्या वैजनाथ देवस्थनावर जाऊन निदर्शन, आंदोलन करणार असल्याचे त्यांनी माहिती दिली आहे.
” एका बाजूला मैदानाला टिपू सुलतानाचे नाव देतात, दुसरीकडे हिरवा झेंडा घेऊन पुढे जातात आणि तिसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिंदू देवस्थानची जमीन मुस्लिम व्यक्तीच्या नावावर होऊन पुढे ती कोणाच्या नावे होते? ” या सर्व प्रश्नाची उत्तरे सौमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितली आहेत.
हे ही वाचा:
रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात पोलीस तक्रार
‘मंत्रालयात माझा फोटो काढणारा उद्धव ठाकरेंचा निकटवर्ती?’
भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार चरणजीत सिंह यांचे निधन
गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डिजिटल बजेट..
दरम्यान, काही दिवसांपूर्वी किरीट सौमय्या नगर विकास खात्यामध्ये गेले असता तिथून त्यांचे अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसलेले काही फोटो व्हायरल झाले होते. त्यावरून वादंग उठले आणि त्यांना पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसायचे आहे का? असा प्रश्न अनिल परबांनी उपस्थित केला होता. त्यावरून सौमय्यांनी अनिल परबांसोबतच मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणले, ‘ अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांना स्वतःच्याच खुर्चीची चिंता आहे. परबांचे तर कॉउंटडाउन सुरु झाले आहे. त्यांचे रिसॉर्ट तुटणार असून त्यांना कायदेशीर कारवाईंना सामोरे जावे लागणार आहे. मुख्यामंत्र्यांची खुर्ची वाचवण्यासाठी सेना आता टिपू सुलतानाचा जयजयकार करत आहेत. ‘
एकंदरीतच, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या तसेच पेशवे काळातील हिंदू देवस्थानची जमीन मुस्लिम व्यक्तीच्या नावावर कशी केली. यामुळे किरीट सौमय्या आता आक्रमक झाले असून, उद्या ते वैजनाथ ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहेत.