…आणि मग अनिल परब यांची आमदारकी रद्द करू!

…आणि मग अनिल परब यांची आमदारकी रद्द करू!

किरीट सोमैय्या यांनी दिला इशारा

ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच आमदारकी रद्द करण्यासाठी आम्ही कार्यवाही करू, असे भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांची, मंत्र्यांची पोलखोल करत आहेत. आता अनिल परब यांच्याविरोधात त्यांनी तक्रारी केल्या आहेत.

किरीट सोमैय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी परब यांना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. आता पर्यावरण मंत्रालयाने रिसॉर्ट बेकायदेशीर ठरवले. ३ जानेवारीपर्यंत त्यांना उत्तर द्यायचे आहे. मग अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडायचे आदेश येतील. रिसॉर्ट तुटणारच पण आम्ही पुढे जाऊन डिपार्टमेंटकडे चौकशी करणार पैसे कुठून आले. मंत्र्यानेच अनधिकृत बांधकाम केलेले आहे. मंत्रीच असे बांधकाम करतोय त्याचे सदस्यत्व रद्द करावे अशी आमची मागणी आहे. ५-७ जानेवारीला बांधकाम पाडण्याची ऑर्डर आली की, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात आमदारकी रद्द करण्यासाठी राज्यपाल व निवडणूक आयोगाकडे जाऊ.

हे ही वाचा:

नितेश राणेंची नवाब मालिकांना ट्विटरवरून टोलेबाजी

मंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात… मुख्यमंत्र्यांकडे रोख?

‘अटलजींनी देशाला प्रभावशाली आणि विकसित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले’

काँग्रेसच्या घुसखोरीला सावरकर स्मारकाच्या सदस्यांचा विरोध

 

आतापर्यंत किरीट सोमैय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भावना गवळी, मिलिंद नार्वेकर, हसन मुश्रीफ अशा नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला आहे. आता कोणत्या नव्या घोटाळ्यांबद्दल तुम्ही पोलखोल करणार हे विचारल्यावर सोमैय्या म्हणतात की, १८ नेते आणि मंत्री यांची चौकशी कारवाई सुरू आहे. उरलेले जे आहेत, त्यांच्याविरोधातही करणार. एकंदर २८ घोटाळे बाहेर आलेत. दर आठवड्याला घोटाळे बाहेर येणार. एका महिन्यात चार नवे घोटाळे बाहेर येणार.

Exit mobile version