किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप

किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याकडे खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्यांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. सोमय्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने सोमय्यांचा कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक मेल आला होता. या मेलच्या माध्यमातून अज्ञाताने किरीट सोमय्या यांना त्यांचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसेच असे न करण्यासाठी ५० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ समोर आला होता. अधिवेशनात हा मुद्दा गाजला होता. हाच कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अज्ञात आरोपीने दिली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८५ अन्वये नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत, अंबादास दानवेंच्या बोलण्यावर बंदी घालावी

६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून लघुग्रहाचा तुकडा घेऊन नासाचे कॅप्सूल पृथ्वीवर

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

जुलै महिन्यात किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा मुद्दा राज्याच्या विधिमंडळातही उपस्थित झाला होता. दरम्यान या प्रकरणानंतर किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. तसेच या प्रकरणाची सत्यता तपासून चौकशी करावी, अशी मागणी स्वत: किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल, असं आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

Exit mobile version