‘२४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केली’

‘२४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केली’

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर मात्र, या प्रकरणात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतली असून धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत एक हजार घरे, दुकान, गाळे असलेल्या ३६ इमारती ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या आहेत. एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर आला आहे. ईडी, आयकर विभागाद्वारे तपास सुरू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांची आयकर विभागाने चौकशी केली होती. आता सोमय्यांनी त्यांच्यावर निशाणा साधत दोन वर्षात जाधव कुटुंबीयांनी ३६ इमारती विकत घेतल्या असून १००० सदनिका, गाळे आणि ऑफिसेस घेतल्याचा दावा केला आहे. २४ महिन्यांमध्ये केलेल्या एक हजार कोटींच्या भ्रष्ट्राचाराचा पर्दाफाश झाला, अशा आशयाचे ट्वीट किरीट सोमय्यांनी केल आहे.

हे ही वाचा:

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

अमित शाहांनी घेतला जम्मू काश्मीर मधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा

टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप

चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या नावाची यादी जाहीर केली होती. या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते. नंतर नव्या यादीत त्यांनी यशवंत जाधव, मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर आणि यामिनी जाधवांच्या नावांचा समावेश केला होता. याआधी सोमय्यांनी बारा नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये संजय राऊत, अनिल परब, सुजीत पाटेकर, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंद अडसूळ, रविंद्र वायकर, अनिल देशमुख, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांच्या नावांचा समावेश होता.

Exit mobile version