‘उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत’

‘उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत’

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. किरीट सोमय्या हे आज ‘एबीपी माझा’शी बोलत होते. “ध्वनी प्रदूषणाच्या नावावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मेट्रो करशेडची वाट लावली. मग आता ज्या धर्माच्या नावावर सकाळी ४ वाजल्यापासून एवढ्या डेसिबलचे भोंगे चालू का?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, “उद्धव ठाकरे आता अडचणीत आले आहेत. भगवे उतरवून हिरवे झाले आहेत आणि म्हणूनच त्यांना मशिदीच्या भोंग्यांची काळजी आहे,” असा टोला किरीट सोमय्या यांनी लागावला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी योग्य स्थिती निर्माण केली आणि म्हणून ३७० कलम हटवले गेले, बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर निर्माण झालं. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने नियम केला की, पहाटेची अजान बंद होणार. अजान करा पण लाऊडस्पीकरची गरज काय? सर्व योग्य झाल्यास देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची काहीही गरज नाही. उद्धव ठाकरेंनी हिरवे हातात घेतलीये आणि शरणागती पत्करली आहे,” अशी घणाघाती टीका सोमय्या यांनी केली आहे.

हे ही वाचा:

योगी सरकारने धार्मिक स्थळांवरून बेकायदा ५३ हजार ९४२ भोंगे उतरवले

स्पाईसजेट विमानाला लँडिंगवेळी अपघात; ४० जण जखमी

पंतप्रधान निघाले जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्सला

“भोंगे काढायला सांगितले तर हातभार फाटली आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली”

“गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी दहानंतर लाऊड स्पीकर बंद होतो. ज्या धार्मिक स्थळांवर अधिकृत भोंगे आहेत, त्यांचे डेसिबल कंट्रोल करा आणि जे अनधिकृत आहे ते काढून टाका,” असे किरीट सोमय्या म्हणाले. “उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची आता टरकली आहे. अनधिकृत भोंगे जिथे आहेत तिथे जाण्याची त्यांच्यात हिंमत नाहीये. तिथे गेले तर खुर्ची जाणार, तिथे गेले तर वसुली बंद होणार,” अशी घाणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. “हनुमान चालीसा बोलणाऱ्यांना देशद्रोही बोललं जातं आहे. मग पहाटे वाजणाऱ्या भोंग्यांवर आयुक्त संजय पांडे कारवाई का करत नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version