‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’

‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर मंगळवार, २२ मार्च रोजी ईडीने जप्ती आणली आहे. या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात हालचाली सुरू झाल्या आहेत. यावरून आता आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

श्रीधर पाटणकर यांच्या प्रकरणाचा गेले दीड वर्ष ईडीकडे पाठपुरावा केल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. काल फक्त एक व्यवहार ईडीने समोर ठेवला आहे. मात्र, कोट्यवधीचे मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. श्रीधर पाटणकर यांचे प्रकरण उघड झाल्यावर आता उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडून गेली असेल, असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय आहेत ते मुख्यमंत्री यांनी स्पष्ट करावं असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. १९ बंगले लपवण्याचा उद्धव ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले. पण सत्य कधीतरी समोर येतंच, असे किरीट सोमय्या म्हणाले. श्रीधर पाटणकर आणि आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यातील झालेल्या व्यवहाराबद्दल उद्धव ठाकरे काही बोलणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

ट्राउझरमध्ये लपवले होते ३ हजार हिरे

इम्रान खान का आहेत मोदींच्या प्रेमात?

बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम

कोल्हापूर देणार उत्तर

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी २०१४ साली कोमो स्टॉक प्रॉपर्टीज कंपनी तयार केली. ती कंपनी २०१९ मध्ये हवाल किंग नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. याच कंपनीतून ३० कोटी रुपये श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत वळवले गेले, असा दावा किरीट सोमय्या यांनी काही कागदपत्रे दाखवत केला. कालचे पाटणकर यांचे प्रकरण म्हणजे फक्त सुरुवात आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ठाकरे सरकारच्या अजून सहा मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

Exit mobile version